वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जम्मू काश्मीरच्या परिसरामध्ये फुटबॉल क्षेत्रात भरीव योगदान देणारे तसेच भारत आणि ब्रिटन यांच्यातील मैत्रीचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी सतत झगडणारे रियल काश्मीर एफसी फुटबॉल संघाचे प्रमुख प्रशिक्षक डेविड रॉबर्टसन यांचा ब्रिटिश एम्पायर मेडलने (बीईएम) सन्मान केला गेला आहे.
इंग्लंडच्या राणी एलिझाबेथ यांचा शुक्रवारी वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या कामगिरीचा उल्लेख करण्यात आला. दरम्यान गौरव पात्र विविध व्यक्तींची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये रियल काश्मीर फुटबॉल क्लबचे प्रमुख प्रशिक्षक डेविड रॉबर्टसन यांचा समावेश आहे. 52 वर्षीय रॉबर्टसन हे रियल काश्मीर फुटबॉल क्लबचे प्रमुख प्रशिक्षक आहेत. 2017 जानेवारीमध्ये रॉबर्टसन यांनी रियल काश्मीर एफसी संघाच्या प्रशिक्षक पदाची सूत्रे हाती घेतली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली रियल काश्मीर एफसी संघाने आय लीग फुटबॉल स्पर्धेत भरीव कामगिरी केली आहे. गेल्या वर्षीच्या आय लीग हंगामात रियल काश्मीर फुटबॉल क्लबच्या सामन्याला काश्मीरमध्ये सरासरी 25,000 शौकिनांची उपस्थिती होती. काश्मीरसारख्या दुर्गम भागात फुटबॉलची आवड निर्माण करून देण्यात रॉबर्टसन यांचे योगदान कौतुकास्पद म्हणावे लागेल. याची यावेळी दखल घेती गेली. .