लंडन : चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत रियल माद्रीद आणि मँचेस्टर सिटी संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला आहे. ऍनफिल्ड येथे बुधवारी झालेल्या दुसऱया टप्प्यातील सामन्यात रियल माद्रीदला लिव्हरपूलने गोलशून्य बरोबरीत रोखले पण रियल माद्रीदने लिव्हरपूलचा 3-1 अशा सरासरी गोलफरकाने पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला.
रियल माद्रीद या स्पेनच्या फुटबॉल क्लबने गेल्या 8 वर्षांच्या कालावधीत ही स्पर्धा पाचवेळा जिंकली आहे. आता रियल माद्रीद आणि चेल्सी यांच्यात उपांत्य फेरीचा सामना होईल. बुधवारच्या सामन्यात पहिल्या 45 मिनिटांच्या कालावधीत लिव्हरपूलने गोल करण्याच्या अनेक संधी वाया घालविल्या. दोन्ही संघांनी दर्जेदार खेळ करत शेवटपर्यंत गोलफलक कोराच ठेवला.