वृत्तसंस्था/ माद्रीद
स्पॅनीश फुटबॉल क्षेत्रातील अव्वल फुटबॉल क्लब म्हणून ओळखला जाणारा रियल माद्रीद फुटबॉल क्लबचे अध्यक्ष फ्लोरेन्टिनो पेरेझ यांना कोरोनाची बाधा झाली आहे. सदर माहिती 73 वर्षीय पेरेझ यांनी स्वतः दिली आहे.
अलिकडे रियल माद्रीद संघाने स्पॅनीश चॅम्पियन्सशीप फुटबॉल स्पर्धा जिंकली होती. इ.स.2000 साली फ्लोरेन्टीनो पेरेझ यांची रियल माद्रीद संघाच्या अध्यक्षपदासाठी निवड करण्यात आली होती. त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत रियल माद्रीदने झिदान आणि डेव्हिड बेकहॅम या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फुटबॉलपटूंशी रियल माद्रीदने करार केला होता. रियल माद्रीद संघाने चार विविध चॅम्पियन्स लीग स्पर्धा पेरेझ यांच्या अध्यक्षपदाच्या कारकर्दीत जिंकल्या आहेत. पेरेझ यांना काही दिवसांसाठी क्वारंटाईनमध्ये राहावे लागणार असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार चालू आहेत.