वृत्तसंस्था / माद्रीद
इटालियन चषक फुटबॉल स्पर्धेत होत असलेल्या सामन्यात रियल माद्रीदचा संघ ऍटलेटिको माद्रीद संघावर विजय मिळविण्यासाठी प्रयत्नाची शिकस्त करेल. या सामन्यात रियल माद्रीद संघाकडून हेझार्ड आणि गॅरेथ बॅले यांचे पुनरामन अपेक्षित आहे.
बेल्जियमचा फुटबॉलपटू हेझार्ड याला गेल्या नोव्हेंबरमध्ये घोटय़ाला दुखापत झाली होती. चेल्सी संघातून हेझार्डचे रियल माद्रीद संघात आगमन झाले. रियल माद्रीदने मोठय़ा रकमेच्या करारावर हेझार्डला खरेदी केले. या दुखापतीनंतर गेल्या आठवडय़ात प्रमुख प्रशिक्षक झिदान यांच्या मार्गदर्शनाखाली हेझार्डने सराव शिबिरात भाग घेतला होता. त्याचप्रमाणे गॅरेथ बॅलेचे या सामन्यात पुनरागमन होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. रियल माद्रीद आणि ऍटलेटिको माद्रीद यांच्यातील हा सामना प्रतिष्ठेचा ठरणार आहे.