ऑनलाईन टीम / मुंबई :
अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक आणि सॅम्युअल मिरांडा या दोघांना शुक्रवारी अंमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) अटक केली. त्यानंतर त्यांना आज कोर्टासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना 9 सप्टेंबर पर्यंत कोठडी सुनावली आहे. तर कैजन इब्राहिमला 14 दिवसांची कोठडी सुनावली आहे.
याआधी एनसीबीच्या टीमने कसून चौकशी केल्यानंतर शुक्रवारी शौविक आणि सॅम्युअल मिरांडा या दोघांना ताब्यात घेतले होते. न्यायालयात हजर करण्यापूर्वी सर्व आरोपींची कोरोना चाचणी करण्यात आली, जी निगेटिव्ह आली आहे. त्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. न्यायालयात शौविक यांच्याकडून वकील सतीश मानेशिंदे यांनी त्याची बाजू मांडली.
यावेळी वकील सतीश मानेशिंदे यांनी रिमांडला विरोध केला. एनसीबीने कोर्टाकडे सात दिवसांची रिमांड मागितली होती. त्यावेळी आपली बाजू मांडताना ते म्हणाले त्यांच्याकडे ड्रग्ज विषयी बोलणे झालेले संभाषण आहे तसेच आरोपींनी त्या ड्रग्ज पेडलरकडून ड्रग्ज खरेदी केले आहेत त्यांच्यामध्ये पैशाची देवाणघेवाण केली झाली आहे आणि हा एक मोठा गुन्हा आहे.
यावर वकील सतीश मानेशिंदे यांनी सांगितले की, एनसीबीकडे अशा प्रकारचे कोणतेही पुरावे नसल्याने त्यांना रिमांड दिली जाऊ नये. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर दोघांनाही नऊ सप्टेंबर पर्यंत कोठडी सुनावली आहे.
- रिया चक्रवर्तीची उद्या होणार चौकशी
रिया चक्रवर्तीची उद्या म्हणजेच रविवारी चौकशी होणार आहे. याबाबत एनसीबीकडून आज समन्स पाठवले जाणार आहे.