प्रतिनिधी/ मुंबई
बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी अटक केलेल्या रिया चक्रवर्तीने आता ड्रग्ज सेवन करणाऱया बडय़ा कलाकारांची नावे घेतल्यामुळे बॉलीवूड जगत हादरून गेले आहे. त्यांची नावे तिने एनसीबीकडे दिली आहेत. यामध्ये अभिनेत्री सारा अली खानसह अनेकांच्या नावांचा समावेश आहे. यातील अनेकांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी एनसीबीने समन्स पाठविणार आहे.
बॉलीवूडमधील तब्बल 80 टक्के कलाकार हे ड्रग्जचे सेवन करीत असल्याचे तिने चौकशीत सांगितले आहे. रियाने सारा अली खान, रकुल प्रीत, डिझायनर सिमोन खंबाटा, निर्माता आणि दिग्दर्शक मुकेश छाब्रा यांची नावे घेतली आहेत.
दरम्यान, रियाला मंगळवारी अटक केल्यानंतर न्यायालयाने तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. जामिनासाठी तिने केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला होता. तत्पूर्वी एनसीबीने मुंबई-गोवा येथे छापे टाकत ड्रग्जतस्करांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. शहरातील पवई, अंधेरी परिसरात तर गोवा येथे एनसीबीने छापेमार केली आहे. रियाने ड्रग्जसाठी ज्यांच्याशी संपर्क साधला होता, अशा सर्वांना एनसीबी चौकशीसाठी बोलविणार आहे.