नफा कमाई दुप्पटीचे संकेत – विक्रीत वाढीचा अंदाज
वृत्तसंस्था/ मुंबई
देशातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी म्हणून रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची (आरआयएल) ओळख आहे. या कंपनीचा चौथ्या तिमाहीमधील नफा हा दुप्पट होणार असल्याचा अंदाज असून हा आकडा अंदाजे 13 हजार 248 कोटी रुपयावर राहण्याचेही संकेत आहेत. यासोबतच विक्रीत हलकीशी तेजी राहणार असल्याची माहिती आहे.
विश्लेषकांच्या माहितीनुसार कंपनीच्या ऑईल टू टेलीकॉम असा प्रवास असणाऱया रिलायन्सचा 2020-2021 मधील जानेवारी ते मार्च तिमाहीमध्ये फायदा 13,248 कोटीच्या घरात राहण्याचा अंदाज आहे. या अगोदर वर्षभरापूर्वी समान कालावधीच्या तुलनेत हा नफा 109 टक्क्यांनी अधिक राहणार असल्याचेही म्हटले जात आहे.
विक्रीतील वाढ
रिलायन्सची मार्च तिमाहीतील विक्री 2 ते 3 टक्क्याइतकी वाढत जाण्याची माहिती आहे. कोटक सिक्युरिटीने दिलेल्या माहितीनुसार विक्री 2 टक्क्यांनी वाढणार आहे.
गुंतवणूकदारांची नजर
जिओमधील अंबानींनी हिस्सेदारी विकून 1.52 लाख कोटी रुपये जमा केले आहेत. त्याऐवजी कंपनी नवीन मजबूत प्लॅन आखण्याच्या तयारीत आहे. गुंतवणूकदार कंपनीचे समभाग खरेदी करण्यासाठी रस घेतात. मागील 8 ते 10 महिन्यांपासून रिलायन्सचे समभाग दबावाचा प्रवास करत आहेत. यातच आणखीन योजना आखल्यास रिलायन्सच्या समभागांना आणखीन चांगले दिवस येणार असल्याचेही भाकीत केले जात आहे.