15.56 लाख कोटी रुपयांच्या बाजारमूल्यासोबत एचडीएफसी पुढे- टाटा समूह आघाडीवर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बाजारमूल्यासोबत एचडीएफसी समूह दुसरा सर्वात मोठा समूह बनला आहे. दरम्यान रिलायन्स समूहाला कंपनीने मागे टाकले आहे. एचडीएफसी समूहाचे बाजारमूल्य 15.56 लाख कोटी रुपये असून दुसरीकडे यादीत मागे पडलेल्या रिलायन्स समूहाचे बाजारमूल्य 15.24 लाख कोटी रुपयांवर राहिले आहे.
साधारणपणे बाजारातील घसरण आणि गुरुवारी रिलायन्स व सौदी अराम्केसोबतचा व्यवहार रद्द झाल्यामुळे रिलायन्सचे समभाग नकारात्मक स्थितीत राहिले होते. सोमवारी रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग 4 टक्क्यांनी प्रभावीत झाले होते. यामध्ये बाजारमूल्यात जवळपास 70 हजार कोटी रुपयांनी घट झाली आहे. यासह बाजारमूल्य राष्ट्रीय शेअर बाजारावर 14.99 लाख कोटी रुपये राहिले आहे.
18 ऑक्टोबर रोजी बाजारात लिस्टेड कंपन्यांचे बाजारमूल्य 274 लाख कोटी रुपये होते. सोमवारी हा आकडा 260.98 लाख कोटी रुपयावर राहिला होता. म्हणजे एका महिन्याला यामध्ये 13 लाख कोटी रुपयांनी घट राहिली आहे. याच दरम्यान पेटीएम आणि नायका लिस्ट झाले नसते तर यामध्ये 2 लाख कोटी रुपये आणखी कमी झाले असते.
तिसऱया नंबरवर असणाऱया रिलायन्स समूहाचे बाजारमूल्य 22 नोव्हेंबर रोजी 15.24 लाख कोटी रुपये राहिले आहे. चौथ्या स्थानी अदानी समूह राहिला असून यांचे बाजारमूल्य 9 लाख कोटी रुपयाच्या जवळपास राहिले आहे.
टाटा समूह सर्वात मोठा
समूहाची स्थिती पाहिल्यास टाटा समूह सर्वात मोठा समूह ठरला आहे. यामध्ये एकूण 29 लिस्टेड कंपन्यांचे बाजारमूल्य 21.99 लाख कोटी रुपये होते. 18 ऑक्टोबर रोजी याचे बाजारमूल्य हे 23.69 लाख कोटी रुपयावर राहिले होते. यासह बाजारमूल्य 1.70 लाख कोटी रुपये कमी राहिले आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस या सर्वात मोठय़ा कंपनीचे बाजारमूल्य 12.80 लाख कोटी रुपये होते. शेअर बाजारात सर्वाधिक लिस्टेड कंपन्या या टाटा समूहाच्या झाल्या आहेत. टाटाच्या जवळपास 29 कंपन्या लिस्टेड झाल्या आहेत.