वृत्तसंस्था/ मुंबई
देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी भारती एअरटेलने रिलायन्स जिओ सोबतचा स्पेक्ट्रम संबंधातील करार नुकताच पूर्ण केला आहे. या कराराअंतर्गत एअरटेलला 1 हजार 4 कोटी रुपये प्राप्त झाले असल्याचे समजते. याअंतर्गत कंपनीला येणाऱया काळात दूरसंचार क्षेत्रात मजबूत पाय रोवता येणार आहेत.
रिलायन्स जिओसोबत भारती एअरटेल तीन सर्कलमध्ये 800 मेगाहर्टज स्पेक्ट्रमचा वापर करू शकणार आहे. एअरटेलने एप्रिलमध्ये रिलायन्स जिओसोबत स्पेक्ट्रमसंबंधी करार करण्याची घोषणा केली होती. रिलायन्स इंडस्ट्रिजची सहकारी कंपनी रिलायन्स जिओसोबत एअरटेलने आंध्रप्रदेश, दिल्ली आणि मुंबईमध्ये 800 मेगाहर्टज क्षमतेचे स्पेक्ट्रम वापरण्यासंदर्भात करार केला आहे. यामाध्यमातून एअरटेलला दूरसंचार क्षेत्रात आपले योगदान वाढवता येणार आहे.