आर्टिफिशल इंटेलिजन्स क्षेत्रातील कंपनी
वृत्तसंस्था/ मुंबई
रिलायन्स जिओने स्टार्ट अप कंपनी टू प्लॅटफॉर्ममध्ये 25 टक्के हिस्सा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. सदरच्या खरेदीअंतर्गत रिलायन्सचा स्टार्टअप कंपनी टू प्लॅटफॉर्मसोबत करार झाल्याचे कळते.
सॅमसंग तंत्रज्ञान आणि संशोधन संस्थेचे माजी अध्यक्ष प्रणव मिस्त्री यांनी टू प्लॅटफॉर्म स्टार्टअप कंपनीची स्थापना केली आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रामध्ये कंपनी कार्यरत असून उत्तम कार्य पार पाडत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाशी निगडित उत्पादन निर्मिती करण्यामध्ये सदरच्या स्टार्टअप कंपनीचा वाटा अधिक आहे.
भागीदारीचा फायदा- आकाश अंबानी
जिओ प्लॅटफॉर्मचे संचालक आकाश अंबानी यांनी म्हटले आहे की, सदरची भागीदारी ही येणाऱया काळासाठी फार महत्त्वाची ठरणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, वेब 3.0 च्या क्षेत्रातील टू प्लॅटफॉर्मची कामगिरी पाहता त्याचा लाभ जिओला होणार आहे.