मुंबई
मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स रिटेलने रोबोटीक्स क्षेत्रातील कंपनी ऍडव्हर्ब टेक्नॉलॉजीसमध्ये 54 टक्के इतकी हिस्सेदारी खरेदी केल्याचे समजते. सदरची खरेदी ही 983 कोटी रुपयांना झाल्याची माहिती आहे. रिलायन्सकडून प्राप्त झालेल्या गुंतवणूकीचा वापर विदेशात विस्तारासाठी आणि नोएडा येथे रोबो निर्मिती यंत्रणेसाठी केला जाणार आहे. रिलायन्स आता ऍडव्हर्बमधला सर्वात मोठा भागीदार बनला आहे.