वृत्तसंस्था/ मुंबई
मागील काही दिवसांपासून रिलायन्स जिओच्या पाठोपाठ रिलायन्स रिटेलच्या प्लॅटफॉर्ममध्ये सलगची गुंतवणूक मिळत असल्याचे पहावयास मिळत आहे. यामध्ये अबुधाबीची कंपनी मुबादलाने इनवेस्टमेंट रिलायन्स रिटेलमध्ये 6,247.5 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली आहे. रिलायन्सला मुबादलाच्या स्वरुपात पाचवा गुंतवणूकदार मिळाला असल्याचेही कंपनीने सांगितले आहे.
अबुधाबीची सॉवरेन इन्वेस्टर फंड असल्याची माहिती रिलायन्सने शेअर बाजाराला दिली आहे. सदरची गुंतवणूक ही रिटेल वेंचरची 4.285 लाख कोटी रुपये इक्विटी मूल्याइतकी राहणार आहे. याच्या बदल्यात मुबादलास 1.40 टक्क्मयांचा हिस्सा मिळणार आहे.
या व्यवहाराअगोदर मुबादलाने जिओ प्लॅटफॉर्ममध्येही 1.2 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली होती. या अगोदर प्रायक्हेट इक्विटी फर्म जनरल अटलांटिक पार्टनर्सनेही रिलायन्स रिटलेमध्ये 3,675 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
अधिकचा हिस्सा खरेदीने कमी मूल्यात व्यवहार
रिलायन्स रिटेलही मुकेश अंबानींसाठी आयडियल ठरत आहे. ज्यामध्ये जिओ हिस्सेदारीतील विक्री करुन कर्ज मुक्तीचा प्रवास रिलायन्सने केल्याचे मागील काही दिवसापूर्वीच पाहिले आहे. रिलायन्स रिटेलमध्ये या अगोदर दोन केलेल्या गुंतवणुकीतून 4.21 लाख कोटी रुपये मूल्याची हिस्सेदारी गुंतवणूकदारांनी प्राप्त केली आहे.