नवी दिल्ली
रिवोल्ट मोर्ट्सची इलेक्ट्रिक मोटरसायकल आरव्ही400 या मॉडेलचे प्री बुकिंग भारतात पुन्हा सुरु करण्यात आले आहे. यामध्ये फेम-सब्सिडीनंतर आरव्ही400ची किमत 1.07 लाख रुपये एक्सशोरुम राहणार आहे. रिवोल्टच्या वेबसाईटवर लिस्टेडची माहिती देताना यामध्ये युनिक आणि सहज चार्जिंग सिस्टम देणार आहे. यामध्ये चार्जिंगची मजबूत व्यवस्था मिळणार असल्याची माहिती आहे. सध्या कंपनीने भारतामधील जवळपास 70 शहरांमध्ये यांचे बुकिंग वाढविले आहे. यामध्ये मेट्रो शहरांमध्ये ज्यामध्ये दिल्ली, मुंबई, कोलकता आणि चेन्नई या शहरांचा समावेश राहणार आहे. सदरचे मॉडेल हे रेग्युलर कॉस्मिक ब्लॅकमध्ये मिस्ट ग्रे आणि रेबेल रेड कलरमध्ये घेता येणार आहे.