मुंबई / वृत्तसंस्था
दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंत, संघसहकारी शार्दुल ठाकुर यांना शिस्तभंग केल्याबद्दल 100 टक्के मानधन कपातीचा दंड ठोठावण्यात आला असून सहायक प्रशिक्षक प्रवीण आमरे यांच्यावर 100 टक्के मानधन कपात व एका सामन्यातून निलंबित, अशी दुहेरी शिक्षा लादली गेली. राजस्थान रॉयल्सविरुद्ध लढतीत पंत, शार्दुल, आमरे यांच्यावर शिस्तभंगाचा ठपका ठेवला गेला. शेवटच्या षटकातील तिसरा चेंडू नोबॉल दिला नाही म्हणून या सदस्यांनी हुज्जत घातली होती. पंतने तर क्रीझवरील फलंदाजांना तंबूत परतण्याचा सल्लाही दिला होता.