दलित संघर्ष समितीचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही रुक्मिणीनगर येथे पत्र्याच्या घरामध्ये राहत आहोत. पावसाळय़ामध्ये विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आम्ही कुली काम करून पोट भरत आहोत. तेंव्हा आम्हाला तातडीने पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरे मंजूर करावीत, अशी मागणी कर्नाटक दलित संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
आम्ही भटक्मया जमातीमध्ये असून आम्हाला विविध कामांसाठी बाहेर जावे लागते. सध्या रुक्मिणीनगर येथील झोपडपट्टीमध्ये राहत आहे. गवत तसेच पत्र्याचे शेड घालून आम्ही त्यामध्ये जीवन कंठत आहोत. पावसाळय़ामध्ये घरामध्ये पाणी शिरते. त्यामुळे पावसाळय़ात आम्हाला जीवन जगणे मेटाकुटीचे झाले आहे.
जिल्हाधिकाऱयांनी याठिकाणी नुकतीच भेट दिली. त्यांनी आमच्या झोपडपट्टीची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी आम्हाला तेथील नागरिकांची यादी द्यावी, अशी सूचना केली होती. त्यानुसार आम्ही यादी देखील केली आहे. ती यादी आता आम्ही तुम्हाला देत आहे. त्यानुसार तातडीने पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरे बांधून द्यावीत, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली.
यावेळी दलित संघर्ष समितीचे अध्यक्ष मंजुनाथ शहापूर, उपाध्यक्ष प्रकाश शिपरी, नागेश कांडली, नरहरी कांडली, अर्जुन हणमसागर, किरण पुजारी यांच्यासह या परिसरातील महिला उपस्थित होत्या.