कुडचडेतील प्रकार, समाजसेवक अमित पाटकर यांनी वेधले लक्ष : लोकांना उपयुक्त सुविधांवर राजकारण करू नये
प्रतिनिधी /कुडचडे
कुडचडेतील जनतेच्या आरोग्याच्या हितार्थ उपलब्ध केलेल्या आणि संपूर्ण सुविधा असलेल्या रुग्णवाहिकेचे 7 रोजी लोकार्पण केले होते. त्याला 24 दिवस पूर्ण झाले आहेत. पण सदर रुग्णवाहिकेला अजूनपर्यंत आरोग्य खात्याकडून रीतसर परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे बऱयाच लोकांना त्रास सहन करावा लागत आहे, याकडे समाजसेवक अमित पाटकर यांनी आपल्या कुडचडेतील कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन लक्ष वेधले. यावेळी त्यांच्यासोबत कुडचडे काँग्रेस गट अध्यक्ष पुष्कल सावंत, ज्ये÷ कार्यकर्ते मनोहर नाईक व आग्नेलो पिरीस उपस्थित होते.
कुडचडेत बऱयाच रुग्णवाहिका आहेत, पण आपत्कालीन वेळी त्या घटनास्थळी पोहोचत नाहीत. त्यामुळे रुग्णांना खासगी गाडय़ांतून रुग्णालयात न्यावे लागते. या स्थितीची दखल घेत तसेच कुडचडेतील सुशिक्षित लोकांच्या आग्रहामुळे सर्व सोयी असलेली रुग्णवाहिका ताबडतोब उपलब्ध करून लोकार्पण करण्यात आले. आरोग्याच्या दृष्टिकोनातून बघितले, तर सदर रुग्णवाहिकेला आरोग्य खात्याने ताबडतोब परवानगी द्यायला हवी होती. पण कुडचडे आरोग्य केंद्राकडून त्याची आवश्यक त्या प्रमाणे दखल घेतली गेली नाही. त्यामुळे हा विषय मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांपर्यंत पोहोचावा म्हणून पत्रकार परिषद घेण्यात येत आहे, असे पाटकर यांनी स्पष्ट केले.
रुग्णवाहिकेचे लोकार्पण करताना आपण कोणत्याच प्रकारचे राजकारण केलेले नाही. तरी सदर विषयावर कोणी राजकारण करून सरकारी अधिकाऱयांवर दबाव टाकत असेल, तर त्यांना आपण मुद्दाम सांगू इच्छितो की, सदर रुग्णवाहिका ही आपण व्यवसाय करण्यासाठी आणली नसून लोकांना सेवा देण्यासाठी आणलेली आहे. त्याचा फायदा कुडचडेतील प्रत्येक व्यक्तीला व्हावा या हेतूने ती आणलेली आहे. त्यामुळे ज्या गोष्टी जनतेसाठी उपयुक्त आहेत व ज्यांच्यामुळे एखाद्याचा प्राण वाचू शकतो अशा सुविधांवर राजकारण करू नये, असे पाटकर पुढे म्हणाले.
गेल्या दहा वर्षांपासून कुडचडेत जे राजकारण चालले आहे त्याबद्दल जनतेला वेगळे सांगण्याची गरज नाही. तरी गेल्या 24 दिवसांत जनतेला उपयुक्त अशा रुग्णवाहिकेवरून जे राजकारण करण्यात येत आहे ते लज्जास्पद असून सरकारी अधिकारी अशा प्रकारचा दबाव का सहन करतात हा मोठा प्रश्न आहे. कुडचडेत अशा महत्त्वपूर्ण सोयीचा कोणाला त्रास होत आहे ते समजत नाही. तरी ज्या व्यक्तीला हा त्रास होत आहे त्याने समोर यावे. हा विषय सुटला नाही, तर आपण पुढचे पाऊल उचलणार, असा इशारा सावंत यांनी दिला. रुग्णवाहिकेला 24 दिवस झाले, तरी क्षुल्लक त्रुटीमुळे परवानगी अडवून ठेवलेली आहे. यात सदर अधिकाऱयांचा दोष नसून कुडचडेतील राजकारण्याचा वा आरोग्यमंत्र्यांचा हात असण्याची शक्मयता आहे. जर कार्यरत राजकारण्यांना लोकांनी केलेली समाजसेवा पसंत पडत नसेल, तर त्यांनी स्वतः अशा सोयी जनतेला उपलब्ध करून द्याव्यात. कुडचडेतील जनतेने निर्णय घेण्याच्या अगोदर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हा विषय हाताळावा, अशी मागणी नाईक यांनी यावेळी केली.