बेंगळूर
राज्यात दर्जेदार रुग्णवाहिका सेवा पुरविण्याच्या उद्देशाने सध्या जारी असलेल्या व्यवस्थेत आमुलाग्र बदल करण्याची सूचना आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांची दिली आहे. सध्या आपल्याकडे असणाऱया रुग्णवाहिका सेवेमध्ये अनेक त्रुटी आहेत. त्या त्रुटी दूर करून आधुनिक तंत्रज्ञान आणि जागतिक दर्जेची रुग्णवाहिका व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे. 108 रुग्णवाहिका सेवेसाठी राज्य सरकार मोठय़ा प्रमाणात पैसे खर्च करते. मात्र, त्यानुसार दर्जेदार सेवा पुरविली जात नाही. त्यामुळे नव्याने निविदा मागविताना कोणत्याही त्रुटी नसणारी सेवा पुरविणाऱया संस्थेला कंत्राट देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.