प्रतिनिधी/ बेळगाव
वेळेत ऑक्सिजन न मिळाल्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत कुटुंबीय व नातेवाईकांनी इस्पितळासमोर निदर्शने केली. यावेळी खासगी इस्पितळावर दगडफेकीचीही घटना घडली. त्यामुळे मंडोळी रोड परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.
रघुनाथ पेठ, अनगोळ येथील यल्लाप्पा परशराम जाधव (वय 56) यांना श्वसनाचा त्रास सुरू झाल्यामुळे शनिवारी रात्री सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. रविवारी मंडोळी रोडवरील मून हॉस्पिटलमध्ये त्यांना हलविण्यात आले होते. सोमवारी सकाळी यल्लाप्पा यांचा मृत्यू झाला.
वेळेत ऑक्सिजन पुरवठा न केल्यामुळे यल्लाप्पा यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत कुटुंबीय व नातेवाईकांनी निदर्शने केली. संतप्त जमावाने इस्पितळावर दगडफेक केली. घटनेची माहिती समजताच टिळकवाडीचे पोलीस उपनिरीक्षक मणिकंठ पुजारी व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. यल्लाप्पा यांच्या कुटुंबीयांनी टिळकवाडी पोलीस स्थानकात इस्पितळ प्रशासनाविरुद्ध तक्रार केली आहे.
जर इस्पितळात ऑक्सिजन उपलब्ध नव्हता तर रुग्णांना दाखलच का करुन घेतला? असा सवाल कुटुंबीयांनी उपस्थित केला आहे. यासंबंधी मंगळवारी सकाळी 11 वाजता विविध संघटनांच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे इस्पितळ प्रशासनाविरुद्ध तक्रार करण्यात येणार असल्याचे नाना अष्टेकर यांनी सांगितले.
रुग्णाची स्थिती होती चिंताजनक : डॉ. देवगौडा आय.
या संबंधी डॉ. देवगौडा आय. यांच्याशी संपर्क साधला असता मून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी रुग्णाला आणले त्यावेळी त्याची स्थिती चिंताजनक होती. सिटीस्कोर 22 होता. बचावण्याची शक्मयता कमी असल्याचे नातेवाईकांना स्पष्ट करण्यात आले होते. डॉक्टर आणि कर्मचाऱयांनी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु रुग्ण दगावला. त्यानंतर नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये गोंधळ घातला. डॉक्टरांशी उद्धट वर्तन केले. मालमत्तेची नासधूस केली. या संबंधी आपण तक्रार दाखल करणार आहोत.