बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात ब्लॅक फंगसच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने आरोग्य विभागाने कडक सूचना दिल्या आहेत की वैद्यकीय मदत घेणाऱ्यांना कोणत्याही रुग्णालयाने उपचार करण्यास नकार देऊ नये. ज्यांना ब्लॅक फंगसचा संसर्ग झाला आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार केले जावेत. कोणत्याही रुग्णालयाने उपचारास नकार देऊ नये, असे राज्याचे आरोग्यमंत्री के. सुधाकर यांनी म्हंटले आहे.
आरोग्यमंत्री डॉ. के सुधाकर यांनी, “म्युकरमायकोसिस किंवा ब्लॅक फंगसच्या संसर्गाच्या उपचारात काही ईएनटी विशेषज्ञ, नेत्ररोगतज्ज्ञ आणि मॅक्सिलोफेसियल सर्जन यांचा समावेश आहे. ब्लॅक फंगस हा आता साथीचा रोग म्हणून केंद्राने जाहीर केला आहे आणि कोणत्याही रुग्णालयात किंवा वैद्यकीय आस्थापनांमध्ये उपचारांसाठी रुग्ण आल्यास त्यांना प्रवेश नाकारू नये. यासंदर्भातील अधिकृत शासकीय आदेश लवकरच करण्यात येईल, असे तेम्हणाले.
याविषयी सर्व तज्ञ डॉक्टर आमच्या जिल्हा रुग्णालये व शासकीय वैद्यकीय महाविद्यालये उपलब्ध असल्याने नागरिकांनी या रुग्णालयांमध्ये म्युकरमायकोसिसवर उपचार घेऊ शकतात.” असे ते म्हणाले.