प्रतिनिधी/ महाबळेश्वर
महाबळेश्वर येथील मोरारजी गोकुळदास ग्रामीण रुग्णालयास शनिवारी सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट देऊन रुग्णालय परिसरासह सुरु असलेल्या नूतनीकरणाची पाहणी केली बेल एअर हॉस्पिटल एक वर्षासाठी प्रायोगिक तत्वावर हस्तांतरित करण्यात आले होते याची मुदत संपली असून पुढील काळासाठी देखील हस्तांतरित करण्यासंदर्भातील प्रस्ताव तातडीने शासनाकडे पाठवावा महाबळेश्वरवासीय व पर्यटकांना मिळणाया वैद्यकीय सुविधांमध्ये खंड पडू नये असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई,गृहराज्य मंत्री शंभूराजे देसाई,आ अजय चौधरी जिल्हाधिकारी शेखर सिंग,बेल एअरचे फादर टॉमी,बाबा इराणी,डॉ राजीव शहा,बांधकाम व्यावसायिक डी एल शिंदेआदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तीन दिवसांच्या दौयासाठी महाबळेश्वर येथे आले असून शनिवारी सकाळी त्यांनी महाबळेश्वरच्या ग्रामीण रुग्णालयास भेट दिली यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांचे स्वागत बेल एअरचे फादर टॉमी,जेष्ठ उद्योजक जयसिंग मरीवालायांनी केले . दुर्गम डोंगरी भाग व जगप्रसिध्द पर्यटनस्थळ म्हणून ओळख असणार्या महाबळेश्वरमध्ये फक्त एकच ग्रामीण रूग्णालय असल्याने स्थानिक व पर्यटकांना फार अडचणी निर्माण होत होत्या या कारभारात सुधारणा व्हावी अशी मागणी होत असताना रेडक्रॉस सोसायटीच्या पांचगणी येथील प्रसिद्ध बेल एअर हॉस्पिटलला महाराष्ट्र शासनाने एका वर्षासाठी प्रायोगिक तत्वावर हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानुसार महाबळेश्वरचे हे ग्रामीण रुग्णालय शासनाने अटीशर्तीसह करार करून 01 फेब्रुवारी 2019 पासून हस्तांतरित करण्यात आले बेलएअर कडे रुग्नालयाचा कारभार आल्याने गेल्या एक वर्षांपासून महाबळेश्वरवासियांसह पर्यटकांना उत्तम व 24 तास आरोग्य सेवा येथे मिळत आहे सध्या बेल एअर हॉस्पिटल पांचगणी प्रशासनाने या ब्रिटिशकालीन इमारतीचे नूतनीकरण व डागडुजीचे काम सुरु केले असून रुग्णालय प्रशासनाने देणगी स्वरूपात निधी उभा करण्यात आला असून जयसिंग मरीवाला यांचे यासाठी मोठे योगदान लाभले आहे सध्या या नूतनीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरु असून शनिवारी सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रुग्णालयास भेट देऊन उपलब्ध सोयीसुविधा व रुग्णालय नूतनीकरण कामाचा आढावा घेतला मुख्यमंत्री ठाकरे यांनी आयसीयु,सोनिग्राफी,एक्स रे प्रयोगशाळेची बाह्य रुग्णविभागाची पाहणी केली तसेच रुग्णालयातील उपचार घेत असलेल्या रुग्णांची देखील आस्थेवाईकपणे विचारपूस केली तदनंतर त्यांनी पूर्णत्वास गेलेल्या वॉर्डची पाहणी केली नव्याने उभारण्यात येणाया या रुग्नालयाच्या डिझाईनचे अनावरण केले या नूतनीकरणाच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले बेल एअर रुग्णालयाचा एक वर्षासाठी असलेला करार संपुष्टात आला असून वैद्यकीय सुविधेमध्ये खंड पडू पये म्हणून ग्रामीण रुग्णालयाच्या हस्तांतरणाची मुदत वाढविण्याच्या मंजुरीसाठीचा प्रस्ताव तातडीने शासनाकडे पाठविण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.