सदरचा व्यवहार 60.02 कोटींना होण्याचे संकेत -10 मे रोजी संचालक मंडळाकडून मंजुरी
मुंबई
रुचिसोया इंडस्ट्रीजने दिलेल्या माहितीनुसार रुचिसोया बिस्किट व्यवसायाची खरेदी करणार आहे. पतंजली नॅचरल बिस्किट प्रायव्हेट लिमिटेडला 60.02 कोटी रुपयामध्ये खरेदी करणार आहे. या संदर्भात संचालक मंडळाने 10 मे रोजी मंजुरी दिली होती.
कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार पतंजली नॅचरल बिस्किटासोबत व्यवसाय ट्रान्सफरसाठीही करार करण्यात आला आहे. हा व्यवहार येत्या दोन महिन्यात पूर्ण केला जाणार असल्याचीही माहिती आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार सदरचा व्यवहार हा 60.02 कोटी रुपयांना होण्याचे संकेत असून देवाणघेवाण संयुक्तपातळीवर होणार आहे.
रुचिसोयानुसार जवळपास 15 कोटी रुपयाचा व्यवहार बंद होण्याच्या तारखेपर्यंत दिले जाणार आहेत. तर 45 कोटी रुपये हे अगोदर म्हणजे 90 दिवसांच्या आत दिले जाणार असल्याची माहिती आहे. या व्यवहारांमध्ये काँटॅक्ट मॅन्युफॅक्चिरिंग करारासोबत कर्मचाऱयांचे ट्रान्सफर, असेट्स, वर्तमानातील असेट्स आणि देवाणघेवाण, लायसन्स आणि परमिट आदींचा यामध्ये समावेश राहणार आहे.
448 कोटीचा व्यवसाय
पतंजली नॅचरल बिस्किटचा व्यवसाय हा 2019-20 मध्ये 448 कोटी रुपयावर राहिला आहे. दुसऱया बाजूला रुचिसोया ही एक दिवाळखोरीतील कंपनी होती. परंतु 2019 मध्ये बाबा रामदेव यांच्या कंपनी पतंजली आयुर्वेदने खरेदी केली होती. त्यामुळे काही प्रमाणात या कंपनीचा व्यवसाय तेजी पकडत राहिल्याचे दिसून आले आहे.