बेंगळूर
बाबा रामदेव यांच्या मालकीच्या रुची सोया इंडस्ट्रिजने चालू आर्थिक वर्षात दुसऱया तिमाहीअखेर 164 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे. मागच्या वर्षाच्या समान अवधीतील नफ्याची तुलना करता नफा 29 टक्के इतका वाढला आहे. मागच्या वर्षी समान कालावधीत कंपनीने 126 कोटी रुपये इतका नफा मिळवला होता. जुलै ते सप्टेंबर 2021 काळात कंपनीचे उत्पन्न वाढून 6 हजार 10 कोटी रुपयांवर पोहचले आहे. मागच्या वर्षी समान अवधीत 3 हजार 990 कोटी रुपयांचे उत्पन्न कंपनीने प्राप्त केले होते.