वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
देशातील खाद्य तेल उद्योगात कार्यरत असणारी रुची सोयाने पाच महिन्यात 8391 टक्के इतका परतावा दिला आहे. यामध्ये 17 रुपयाचे समभाग 1435 रुपयावर पोहोचले आहेत. कारण सापशिडीच्या खेळाप्रमाणे रुची सोयाचा प्रवास राहिला आहे. यामध्ये दिवाळखोरीच्या कारणामुळे हा उद्योग कायम चर्चेत राहिल्याचे पहावयास मिळाले आहे. परंतु सध्याची चर्चा ही समभागांच्या तेजीच्या कामगिरीने योग्य टप्प्यावर असल्याचे दाखवून दिले आहे.
27 जानेवारीला शेअर बाजारात रि लिस्ट झाल्यानंतर रुची सोयाने जबरदस्त नफा कमाई केली आहे. कारण 27 जानेवारीला रुची सोयाचा एक समभाग 16.90 रुपयाला होता. तर तेच मूल्य 25 जून रोजी एक समभाग वधारुन 1435.55 रुपयावर पोहोचले. हा आकडा लक्षात घेता पाच महिन्यांमध्ये 8391 टक्के मजबूत परतावा दिल्याचे पहावयास मिळाले आहे.
सन 2012 मध्ये डेलॉयच्या ग्लोबल पॉवर्स ऑफ कंझ्युमर प्रोडक्ट इंडस्ट्री 2012 च्या अहवालानुसार रुची सोयाने प्रमुख 250 ग्राहक उत्पादन कंपन्यांमध्ये 175 वे स्थान पटकावले आहे. मात्र कंपनीवर जवळपास एकूण 9345 कोटी रुपयांचे कर्ज झाले होते आणि त्यामुळे हिचा दिवाळखोरीचा प्रवास सुरु झाला होता. परंतु 2017 मध्ये नॅशनल लॉ ट्रिब्यून यांनी इन सॉल्वेन्सी प्रक्रियेसह रुची सोयाच्या लिलावाचा आदेश दिला होता आणि बाबा रामदेव यांच्या पतंजलीने डिसेंबर 2019 मध्ये 4350 कोटी रुपयांना रुची सोयाची खरेदी केली आहे. त्यानंतर रुचीचे भविष्यच बदलून गेले.
रुचीचा तेजीचा प्रवास
दिनांक वाढ(रुपये)
27 जानेवारी 16.9
27 फेब्रुवारी 58.7
27 मार्च 154.9
27 एप्रिल 354.4
27 मे 515.6
25 जून 1435.55