एका कुटुंबाकडून दुसऱया कुटुंबावर दरोडय़ाचा गुन्हा तर दुसऱया कुटुंबाकडून विनयभंगाचा
प्रतिनिधी/ सातारा
येथील तामजाईनगरातील रुद्राक्ष टॉवरमध्ये रहाणाऱया दोन कुटुंबात हाणामारीची घटना दि.18 रोजी दुपारी साडेतीन वाजता घडली. त्या प्रकरणी एका कुटुंबाकडून विनयभंगाचा व मारहाणीचा आणि शस्त्र वापरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसऱया कुटुंबाकडून पहिल्या कुटुंबातील सदस्यावर दरोडय़ाचा गुन्हा दाखल झाला आहे. शाहुपूरी पोलिसांत या घटनेची नोंद झालेली आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, एका महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार ती तिच्या लहान बाळाला दि.18 रोजी दुपारी 3.30 वाजता पार्किंगमध्ये लहान बाळाला घेवून फिरायला आली होती. त्यावेळी हर्षद नलावडे याने फिर्यादी महिलेच्या मानेवर सुरी ठेवून मला तुला मारायची सुपारी दिली आहे. तुला जीवंत ठेवत नाही. असे म्हणून मारहाण करु लागला तर मनिषा नलावडे यांनी शिवीगाळ करत मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. त्या महिलेच्या पतीने हर्षद नलावडे याच्या हातातील सुरा बाजुला काढून सोडवणूक केली. त्यावरुन दोघांच्यावर भा.द.वि.स.354, 323, 504,506, 34 अन्वये गुन्हा दाखल झाला असून शाहुपूरी पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस सुर्यवंशी या तपास करत आहेत. तर मनिषा आनंदा नलावडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन त्या रुद्राक्ष रेसिडेन्सीमध्ये रहातात. त्यांची लहान मुलगी मैत्रीणीसोबत पार्किंगमध्ये खेळायला गेली होती. त्यावेळी एका महिलेने येथे खेळू नको असे म्हणत शिवीगाळ, दमदाटी केली. त्यावरुन तिचा पती, तिचा दीर आणि तिची सासू यांनी भांडणास सुरुवात केली. त्या वादात त्यांच्या गळय़ातील 40 हजार रुपयांचे सोन्याचे मिनी घंटन हिसकावून नेले. त्या महिलेच्या पतीने कोयत्याने दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. त्यात पायावर थोडीशी जखम झाली असून एकाने उचलून दगड फेकून मारला तो दगड उडून बाजूच्या रिक्षावर पडला. त्यावरुन भा.द.वि.स.392 सह कलमान्वये गुन्हा दाखल झाला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे यांच्याकडे तपास करत आहेत. दरम्यान, घटनास्थळी सह पोलीस अधीक्षक श्रीमती ऑचल दलाल यांनी भेट दिली आहे.