प्रतिनिधी/ बेळगाव
कर्नाटक राज्य मानव हक्क आयोगाचे रुपकुमार दत्ता यांनी माहेश्वरी अंध शाळेला नुकतीच भेट दिली. संस्था व शाळेचे कार्य पाहून त्यांनी प्रशंसा केली. महिला आणि बाल कल्याण खात्याचे उपसंचालक बसवराज ए. एम यांनी ही विद्यार्थ्यांना समाजासोबत जीवन जगण्यासाठी स्वतः सक्षम व हुशार व्हा, असे सांगितले.
संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर बेंबळगी यांनी संस्था व शाळेतील समस्या सांगून सरकारने योग्य तो न्याय द्यावा, असे सांगितले. संस्थेचे सहसचिव राजशेखर हिरेमठ यांनी शाळेची माहिती दिली. मुख्याध्यापिका अनिता गावडे यांनी आभार मानले.