ऑनलाईन टीम / पुणे :
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे कार्यालय पेटवून देण्याची धमकी देण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जयंत रामचंद्र पाटील या व्यक्तीने रुपाली चाकणकर यांना कार्यालयात तोडफोट करुन पेटवून देण्याची धमकी दिली आहे. जयंत पाटील हे सांगलीतील तांबवे येथील रहिवाशी आहेत.
रुपाली चाकणकर यांचे धायरी येथे कार्यालय आहे. या कार्यालयात शुक्रवारी सायंकाळी सदर व्यक्तीने फोन करुन कार्यालय पेटवून देतो अशी धमकी दिली. धमकीचा फोन आला तेव्हा रुपाली चाकणकर कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. त्या परत आल्यानंतर सदर घडलेला प्रकार स्वीय सहाय्यक राजदीप कठाळे यांनी रुपाली चाकणकर यांना सांगितला.
त्यानंतर चाकणकर यांनी सिंहगड रस्ता पोलीस स्टेशन येथे सदर व्यक्ती विरोधात तक्रार दिली. तक्रारीच्या आधारावर सिंहगड पोलिसांनी सदर व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.