अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. सर्वत्र आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु आहे. या आनंददायी वातावरण अधिकच भर टाकणारे ‘देवा गणराया’ हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. काही दिवसांपूर्वी या गाण्याचे पोस्टर झळकले होते आणि त्याला भक्तांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला त्यामुळे प्रेक्षकांची उत्कंठा अधिक न वाढवता हे गाणे अखेर भेटीला आले. चिन्मय उदगीरकर आणि रुपाली भोसले यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या या सुमधुर गाण्याला स्वप्नील बांदोडकर यांच्या आवाजाने चारचाँद लावले आहेत. संदीप माळवी यांनी हे गाणे शब्दबद्ध केले असून सुमन एन्टरटेंमेन्ट आणि मिडिया प्रा. लि. प्रस्तुत या गाण्याचे संगीत चिनार-महेश यांनी केले आहे. या गाण्याची निर्मिती केदार जोशी यांची असून दिग्दर्शन आशिष नेवाळकर यांचे आहे. हे गाणे आपल्या लाडक्या बाप्पावर आधारित असले तरी या गाण्याला एक कथा आहे. आपण कोणत्याही शुभकार्याची सुरुवात ही बाप्पाच्या आशीर्वादाने करतो. या गाण्यातील जोडपेही त्यांच्या सुखी संसाराची सुरुवात बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊन करताना दिसत आहेत.
Previous Articleभारत-इंग्लंड पाचवी कसोटी आजपासून
Next Article सावधानता आवश्यक
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.