प्रतिनिधी / डिचोली
मये येथील युवा सामाजिक कार्यकर्ते विजयानंद ज्ञानप्रकाश संस्थेचे अध्यक्ष रुपेश ठाणेकर यांचा आज सोम. दि. 22 नोव्हे. रोजी वाढदिवस असून या निमित्त मये महामाया विद्यालय परिसरात विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती आयोजन समितीचे कमलाकांत तारी, उदय पत्रे, आनंद नार्वेकर, अविनाश होबळे, हृदयनाथ वळवईकर, सागर च्यारी, उमेश गडेकर, सर्वेश पेडणेकर, रामनाथ चोडणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली
सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, गोसेवा अशा अनेक क्षेत्रात त्यांचे सेवा कार्य सुरू आहे. मये सारख्या ग्रामीण भागात शैक्षणिक विकासाठी त्यांनी प्राथमिक शाळा विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय इमारत उभारणी शैक्षणिक विकास सामाजिक सेवा अशा चौफेर क्षेत्रात योगदान दिले आहे. गोरगरिबांना मदतीचा हात देण्यासाठी ते सतत पुढे असतात.
अशा या सेवकाचा वाढदिवस सर्व मित्रपरिवार व हितचिंतकांच्या उपस्थितीत सोमवारी 22 रोजी संध्या. 6 वा. महामाया विद्यालय प्रांगणात मये येथे आयोजित केला असून शुभेच्या देण्यासाठी उपस्थिती लावावी असे आवाहन या वेळी आयोजन समितीच्या पदाधिकाऱयांनी केले आहे