प्रतिनिधी /फातोर्डा
श्री साई समर्थ घोगळेश्वर घुमट आरती मंडळाने ‘घुमट ब्रह्मांड’ ही अखिल गोवा घुमट आरती स्पर्धा दवर्ली, रुमडामळ येथील श्री स्वामी समर्थ मंदिराच्या सभागृहात आयोजित केली होती. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पहिले पारितोषिक रु. 10000, चषक व प्रशस्तीपत्र साई बोडगेश्वर पथक (म्हापसा) यांना मिळाले.
दुसरे पारितोषिक रु. 7000, चषक व प्रशस्तीपत्र हेरंब घुमट आरती मंडळ (धारगळ), तिसरे रु. 5000 रोख, चषक, प्रशस्तीपत्र वैरागी नवदुर्गा मंडळ (मडकई), चौथे? साई म्हाळसा (म्हार्दोळ) तर पाचवे पारितोषिक नवसाई आरती मंडळ (बोरी) यांना देण्यात आले. त्यांना प्रत्येकी रु. 2500, चषक व प्रशस्तीपत्र प्राप्त झाले. इतर पारितोषिके ?उत्कृष्ट घुमट संच-साई म्हाळसा, शामेळवादन-सातेरी आरती मंडळ, म्हापसा यांचे साईदत्त वराडकर, उत्कृष्ट कासाळेवादन-वैरागी नवदुर्गा मंडळ, मडकईचे साईराज नाईक, उत्कृष्ट गायक-हेरंब घुमट आरती मंडळ, धारगळचे? ओंकार केरकर यांना मिळाली. त्यांना प्रत्येकी रु. 500 रोख, प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह असे बक्षीस मिळाले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून स्वराज पिंगे, जयेश नाईक, रसिकदास वस्त यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन मयूर म्हाळशी यांनी केले.