आवडत्या म्युझिकसाठी नववधूने धरला हट्ट…
आपण नेहमीच लग्नसमारंभ, सोहळे यांना लहानपणापासून जात असतो. लग्नातील जोडपे, लग्नात देण्यात येणारी सात वचने, विधी, हळदी समारंभ, मंगलाष्टके, सात फेरे हे सगळे शब्द आपल्या कानावर जातातच. या सर्व समारंभांमध्ये आपला मित्रपरिवार, कुटुंब एकत्र येते आणि हीच आपल्यासाठी पर्वणी असते. मात्र, सर्व रितीरिवाज केले जात असतानाच वरपक्ष आणि वधूपक्ष यांच्याकडून झालेल्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्षणे घडलेल्या चुकांमधून रुसवे-फुगवे करण्याचे प्रकारही कुठे-कुठे घडतात. काही काही वेळा हे रुसवे इतके ताणले जातात की विवाह सोहळाही ऐनवेळी मोडला जातो.
लग्नसोहळय़ात एंट्री म्युझिकची चांगलीच पेझ आहे. सर्व वऱहाडी मंडळींचे लग्नात वधूच्या एंट्रीकडे लक्ष लागलेले असते. त्यामुळे म्युझिकल एंट्री हा एक लग्नाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. त्यासाठी अगोदरपासूनच नियोजन सुरू होते आणि ते लग्नाच्या दिवसापर्यंत सुरू असते. वधूने स्वतः प्रवेशावर अधिक लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे. नुकताच एका नववधूचा व्हिडीओ व्हायरल झाला असून जिने तिच्या पसंतीचे गाणे वाजवले नाही तर लग्नात प्रवेश करण्यास नकार दिला आहे नववधूच्या जिद्दीचा हा व्हिडीओ सोशल मीडिया यूजर्सकडून खूप लाईक केला जात आहे. हा व्हिडीओ पाहून लोक मजा घेत आहेत. आतापर्यंत त्याला जवळपास दहा हजार लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडीओवर लोक अनेक मजेशीर कमेंटही करत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या इतर प्लॅटफॉर्मवरही शेअर केला जात आहे.
नवऱयाने वरमाला फेकल्याने नवरीचा विवाहाला नकार
उत्तर प्रदेशमधील औरिया जिह्यात एका विवाहादरम्यान विचित्र प्रकार घडला. नवऱयाने वरमाला नवरीवर फेकल्याने संतापलेल्या नवरीने लग्नच मोडले आहे. कुटुंबियांनी नवरीला समजवायचा बराच प्रयत्न केला मात्र ती लग्न न करण्याच्या निर्णयावर ठाम राहिली.
औरिया जिह्यातील नवीन बस्ती भागात ही घटना घडली असून याची राज्यात सध्या बरीच चर्चा आहे. लग्नाचा विधी सुरू असताना नवरदेवाने मस्करीत नवरीमुलीवर वरमाला फेकली. मात्र भर मांडवात आपल्यासोबत घडलेला प्रकार नवरीला सहन झाला नाही. तिने ती वरमाला बाजूला ठेवत तेथून थेट खोलीत निघून गेली. त्यानंतर रसिकाचे कुटुंबीय व नातेवाईक तिला पुन्हा मंडपात आणायला गेले तेव्हा तिने लग्न करण्यास नकार दिला. घरातल्यांनी बरीच समजूत काढूनही मुलगी पुन्हा बोहल्यावर न चढल्याने नवऱयामुलासह त्यांच्या कुटुंबियांना माघारी परतावे लागले.