लव्ह लग्न लोचा या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली आणि तरुणांच्या गळय़ातील ताईत असलेल्या रूचिराचे लग्न तीन मे ला पाचगणीतील एका खाजगी रिसॉर्टमध्ये होणार आहे. सतत सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या रूचिरानेच आनंदाची बातमी शेअर केली आहे. विशेष म्हणजे तीन दिवस चालणाऱया या लग्न सोहळय़ात रूचिताने तिच्या आईचा शालू नेसण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे डोक्यावर अक्षता पडताना रूचिता तिच्या आईच्या शालूमध्ये सजलेली पहायला मिळेल.अभिनयक्षेत्रातील ग्लॅमर कितीही भुरळ पाडत असलं तरी वेळच्यावेळी लग्न करण्यासाठी आता प्रत्येक सेलिब्रिटी थोडा ब्रेक घेत आहेत. गेल्यावर्षीपासून अनेक कलाकारांनी आपल्या जोडीदाराची निवड केली. कुणी कोरोनाकाळात मोजक्याच उपस्थितांच्या साक्षीने नव्या आयुष्याला सुरूवात केली तर काहीजणांनी कोरोना आटोक्यात यायची वाट बघत यंदाच्या वर्षाच्या सुरूवातीलाच लग्न गाठ बांधली. आता या यादीत अभिनेत्री रूचिता जाधव हीदेखील आली आहे. रूचिता मुळची पुण्याची असून तिने आपल्या रूपेरी जगतातील कामाची सुरूवात जाहीरातींपासून केली. एका होजिअरीच्या ब्रँडसाठी रूचिताला मॉडेल म्हणून पहिली संधी मिळाली. त्यानंतर रूचिताने खूप जाहीराती केल्या. यातूनच तिला अभिनयाची गोडी लागली. यापूर्वी तिने माणूस एक माती, वेलकम टू जंगल, फेकमफाक, चिंतामणी, मनातल्या उन्हात या सिनेमात काम केले आहे.फेसबुक, इन्स्टा या सोशलमीडियावर सतत हॉट फोटो शेअर करणारी व व्हिडिओ बनवणारी रूचिता कुणाच्या प्रेमात पडणार अशी चर्चा होती. तिने अरेंज मॅरेज करायचे ठरवले. गेल्या वर्षी रूचिताला आनंद माने याचे स्थळ आले. पण तेव्हा रूचिता लग्न करण्याच्या मानसिकेत नसल्याने तिने आनंदला भेटण्याचा निर्णय लांबणीवर टाकला होता. दरम्यान कोरोना आणि रूचिता व आनंद यांची भेट झाली नाही. आनंद हा मुंबईतील एक व्यावसायिक असून एका राजकीय पक्षाचा समन्वयक म्हणून काम करतो. डिसेंबर 2020 मध्ये रूचिता आणि आनंद भेटले आणि त्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. गेल्या महिन्यात आनंदने रूचिताला एकदम रोमँटिक अंदाजात प्रपोज केले. ते फोटोही रूचिताने शेअर केले आहेत.
Previous Articleममतांनी केलेले आरोप खोटे
Next Article स्पेनचा नदाल मानांकनात दुसरा
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.