वृत्तसंस्था/ ब्युनोस आयरीस
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या अर्जेंटिना खुल्या पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत कॅस्पर रूडने डेल्बोनीसचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला तर दुसऱया एका सामन्यात अर्जेंटिनाच्या शुवार्त्झमनने सोनेगोवर मात करत अंतिम फेरी गाठली
शनिवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात नॉर्वेच्या आठव्या मानांकित कॅस्पर रूडने डेल्बोनीसचा 6-3, 6-3 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. दुसऱया उपांत्य सामन्यात अर्जेंटिनाच्या शुवार्त्झमनने सोनेगोचा 7-5, 3-6, 6-2 असा पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळविले. रूड आणि शुवार्त्झमन यांच्यात एकेरीच्या जेतेपदासाठी लढत होईल.