वृत्तसंस्था / रोम
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या इटालियन खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत रूमानियाची टॉप सीडेड महिला टेनिसपटू सिमोना हॅलेपने एकेरीची अंतिम फेरी गाठताना स्पेनच्या मुगुरूझाचे आव्हान संपुष्टात आणले. हॅलेपने या स्पर्धेत तिसऱयांदा अंतिम फेरी गाठली आहे.
क्लेकोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत शनिवारी हॅलेपने उपांत्य फेरीच्या सामन्यात स्पेनच्या गार्बेनी मुगुरूझाचा 6-3, 4-6, 6-4 असा पराभव केला. या दोन माजी प्रेंच ग्रॅण्ड स्लॅम विजेत्या खेळाडूंमधील हा उपांत्य सामना रंगतदार झाला. 2018 साली हॅलेपने पेंच ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा जिंकली होती. 28 वर्षीय हॅलेपने रोममधील या स्पर्धेत 2017 आणि 2018 साली अंतिम फेरीत प्रवेश मिळविला होता. स्पेनच्या नवव्या मानांकित मुगुरूझाने 2016 साली पेंच ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा जिंकली होती. इटालियन टेनिस स्पर्धेतील मुगुरूझाचा उपांत्य फेरीतील हा चौथा पराभव आहे. रूमानियाच्या हॅलेपने यापूर्वी दोनवेळा या स्पर्धेचे उपविजेतेपद मिळविले होते. या स्पर्धेत झेक प्रजासत्ताकच्या माजी विजेत्यहा प्लिसकोव्हाने उपांत्य फेरीत प्रवेश मिळविताना बेल्जियमच्या मर्टन्सचा 6-3, 3-6, 6-0 तर स्पेनच्या मुगुरूझाने शेवटच्या चार खेळाडूंत स्थान मिळविताना बेलारूसच्या अझारेंकाचा 3-6, 6-3, 6-4 त्याचप्रमाणे व्होंड्रोसोव्हाने स्विटोलिनाचा 6-3, 6-0 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला होता. कझाकस्तानच्या पुतिनसेव्हाने दुखापतीमुळे आपला सामना अर्धवट सोडल्याने हॅलेपने उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला होता