प्रतिनिधी/ बेळगाव
इंडियन रेडक्रॉस सोसायटी बेळगाव यांच्या वतीने जिल्हय़ातील शिक्षकांसाठी प्रथमोपचार जागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आयएमएचे अध्यक्ष डॉ. अनिल पाटील, शहर शिक्षणाधिकारी रवी बजंत्री उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रेडक्रॉसचे चेअरमन अशोक बदामी होते.
यावेळी बोलताना रवी बजंत्री म्हणाले आयुर्वेदीक उपचार हे प्रथमोपचार म्हणून आपण वापरले पाहिजेत असे त्यांनी सांगितले. आयएमएचे अध्यक्ष अनिल पाटील यांनी अत्यावश्यक काळात प्रथमोपचार कसा द्यावा याविषयी माहिती दिली. यावेळी सेपेटरी प्रा. डी. एन. मिसाळे, ले. कर्नल विनोदिनी शर्मा, प्रिया पुरणिक, इ. सी. सुमंत, महिला विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कवीता परमाणिक यांच्यासह उपस्थित होते. 150 हून अधिक शिक्षकांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला.