मुंबई
शाओमी कंपनीचा नवा रेडमी नोट 11 टी हा 5 जी स्मार्टफोन येत्या 30 नोव्हेंबरला लाँच केला जाणार असल्याची माहिती आहे. सदरचा फोन हा नोट 10 टी 5 जीची सुधारीत आवृत्ती असणार असल्याचे समजते.
रेडमी नोट 11 मागच्या महिन्यात चीनमध्ये लाँच करण्यात आला होता. नव्या डिझाइनसह येणारा हा स्मार्टफोन 11 सिरीजचा भारतातील पहिला असल्याचा दावा केला जातो आहे. याला कंपनीने ‘नेक्स्ट जन रेसर’ असे नाव दिले असून यात स्विफ्ट डिस्प्ले, फास्ट चार्जिंग आणि रॅम बुस्टर यासारखी वैशिष्टय़े असणार आहेत. रेडमी नोट 11 चाच नव्याने विकसित केलेला रेडमी नोट 11 टी असणार असल्याचे बोलले जात आहे.
वैशिष्टय़े पाहुया..
6.6 इंच एफएचडी डिस्प्ले पॅनेल
5000 एमएएच बॅटरी
33 वॉट फास्ट चार्जिंगची सुविधा
सेंटर-अलाइन पंच होल कॅमेरा
50 एमपी रियर तर 16 एमपी प्रंट कॅमेरा
स्टारडस्ट व्हाईट, मॅट ब्लॅक, ऍक्वामरीन ब्लू रंगात येणार