वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
प्रो-टेनिस लिग स्पर्धेत रेडियंट संघाने स्टॅग बेबोलट योद्धाज संघाचा 6-0 असा एकतर्फी पराभव करत उपांत्यफेरीत प्रवेश मिळविला. या स्पर्धेतील अन्य एका सामन्यात बेंगळूर चॅलेंजर्सने डीएमजी प्रुसेडर्सचा पराभव केला.
या स्पर्धेतील तिसऱया दिवशी बेंगळूर चॅलेंजर्सने डीएमसी प्रुसेडर्स बरोबरच्या लढतीत 6 पैकी 5 सामने जिंकून आपली विजयी घौडदौड कायम राखली. जनरल विभागात पर्व नागेने आयटीएफच्या निशांत दबासचा 5-3 असा पराभव केला. प्रो- पुरुष-1 विभागातील लढतीत रेडियंटच्या साकेत मायनेनीने स्टॅग बेबोलेट योद्धाजच्या सुंदर प्रशांतचा टायब्रेकरमध्ये 5-4 (5-3) असा पराभव केला. रेडियंट संघातील अर्जुन उप्पल आणि प्रेमा भांब्री या जोडीने स्टॅग बेबोलेटच्या निशांत गोयेल आणि व्ही. चौधरी यांचा पराभव केला. निकी पुनाचाने विष्णूवर्धनवर 5-3 अशी मात केली. बेंगळूर चॅलेंजर्सच्या पारस दाहियाने डीएमजी प्रुसेडर्सच्या करणसिंगवर 5-1 अशी मात केली. मिश्र दुहेरीच्या सामन्यात दिलीप मोहांती आणि साई समिता यांनी ऋषीकपूर व काशीस भाटिया यांचा 5-1 असा पराभव केला.