मुंबई
सध्याला सर्वच व्यवसायांना आणि कंपन्यांना कोरोनाच्या प्रादुर्भावाचा धीराने सामना करावा लागतो आहे. अनेक समस्या आणि अडथळे यांच्याशी दोन हात करण्याची वेळ कंपन्यांवर सध्या आलेली आहे. टाटा उद्योग समूहाने यातूनही मार्ग काढण्याचे ठरवले असून आगामी काळात आपल्या रेडी टू इट व्यवसायाचा विस्तार करण्याचा निर्धार कंपनीने केला आहे.सध्या हा व्यवसाय मोठय़ा शहरांमध्ये जसे की टायर-1 शहरांमध्ये सुरू असून इतर टायर- 2 शहरांमध्ये विस्तारण्याची कंपनीने योजना आखली आहे. उत्पादनांची निर्मिती वाढवून त्यांच्या वितरणाचे जाळे विस्तारीत करण्याची योजना टाटाने बनवली आहे. टाटा स्मार्ट फुडने नोव्हेंबर 2019 मध्ये रेडी टू इट
ब्रँडअंतर्गत ‘टाटा क्मयू’ विविध उत्पादने बाजारात दाखल केली होती. सध्या दिल्ली-एनसीआर, मुंबई, बेंगळूर, हैदराबाद, कोलकाता, पुणे आणि चेन्नई या शहरांमध्ये टाटाने आपली वरील उत्पादने उपलब्ध केली आहेत. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्ममुळे व्यवसायाचा विस्तार करणे सोपे जात असल्याचे कंपनीने म्हटले आहे. हीच बाब लक्षात घेऊन टाटाने रेडी टू इट उत्पादनांच्या विक्रीकरता इतर शहरांवरही लक्ष केंद्रित करण्याचे निश्चित केले आहे. सध्याच्या घडीला टाटा पास्ता, नूडल्स, राईस डिशेस आणि कॉम्बी मिल्ससारखी उत्पादने सादर करते आहे.