रेडी /प्रतिनिधी-
रेडी बंदरातून चालू निर्यात हंगामात एक लाख मे. टन लोह खनिज परदेशात निर्यात करण्यात आले आहे.
जागतिक बाजार पेठेत लोहखनिजाचे दर कमी झाल्याने लोह खनिज निर्यातीवर याचा परिणाम झाला आहे. अजून पर्यत कळणे साटेली तळवणे या खाणी वरील लोह खनिज रेडी बंदरावर येण्यास सुरूवात झालेली नाही. चालू हंगामात रेडी येथिल आय एल पी एल या एकाच कंपनीने एका जहाजातून ६0 हजार मे. टन लोह खनिज पावडर व ४0 हजार मे. टन लंपी ( खडी )मिळून एक लाख मे. टन लोह खनिज परदेशात निर्यात केले आहे.
आता चालू लोह खनिज निर्यात हंगाम संपण्यास तीन महिने शिल्लक आहेत. चालू खनिज निर्यात हंगाम धिम्यागतिने सुरू असल्याने या व्यावसायावर अवंलबून असलेल्या व्यावसायिकांना मुबलक प्रमाणात खनिज वाहतूकीचे काम मिळत नसल्याने डंपर मालक चिंतेत सापडले आहेत.