वेंगुर्ला/प्रतिनिधी:-
रेडी ग्रामपंचायत हद्दीतील रेडी मुख्य रस्ता ते रेडी-माऊली मंदिर रस्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने वहातुकिस गैरसोईचा,असुरक्षित व धोकादायक बनलेला आहे. सदर रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील असल्याने या रस्त्याचे काम त्वरीत करून वाहनांबरोबरच पादचाऱ्यांना होणारा त्रास दूर करावा. अशी मागणी रेडी ग्रामपंचायतीचे सरपंच रामसिंग राणे, जिल्हा परिषद सदस्य तथा जि.प.चे माजी आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, ग्रामपंचायत सदस्य आनंद भिसे, शैलेश तिवरेकर यांनी सावंतवाडी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपकार्यकारी अधिकारी सिमा गोवेकर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मागणी केली आहे. तसेच लेखी निवेदनही सादर केले आहे.