रेड नोटीस या चित्रपटामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुन्हेगारी विश्वात इंटरपोलच्या कामाची पद्धत, गुन्हेगारांचा माग काढणे, रेड नोटीस बजावणे पाहायला मिळणार आहे. महागडय़ा चित्रकलांच्या चोऱया करणाऱया एका चोराला शोधण्यासाठी इंटरपोलतर्फे रेड नोटीस जारी करण्यात येते. या चोराचा शोध कशाप्रकारे घेतला जातो याची कहाणी या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ड्वेन जॉन्सन, गल भूमिका या चित्रपटात आहेत. रॉसन मार्शल थर्बरने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
संकलन : अपूर्वा सावंत, मुंबई