प्रतिनिधी/ पणजी
खदरवर्षी पावसाळा सुरु होण्या अगोदर बाजारात अनेक पावसाळी सामग्री मोठय़ा प्रमाणात उपलब्ध होत असतात, परंतु यावर्षी लॉकडाऊनमुळे कमी प्रमाणात पावसाळी सामग्री बाजारात उपलब्ध झाली आहे. खासकरुन रेनकोट, छत्र्या, पावसाळी चपले, यांचा यात समावेश आहे.
दरवर्षी रेनकोट, छत्र्या, चप्पले यांना मोठय़ा प्रमाणात मागणी असते. सध्या दर्जेदार सामग्री मार्केटमध्ये दिसत नाही आहे. रेनकोट, छत्र्या कमी प्रमाणात ठारावीक दुकानामध्ये दाखल झाल्यामुळे त्यांच्या किमतीत देखील वाढ करण्यात आली आहे.
सध्या रेनकोट रु. 800 ते रु. 1500 पर्यंत उपलब्ध आहेत. लहान मुलांचे रेनकोट रु. 300 ते 700 पर्यंत उपलब्ध आहेत. तसेच चांगल्या दर्जेदार छत्र्या कमीतकमी रु. 300 ते रु. 600 पर्यंत बाजारात उपलब्ध आहेत. तर चप्पले रु. 350 ते 500 पर्यंत उपलब्ध आहेत.