मुंबई
लहान मुलांच्या सेवेत असणाऱया हॉस्पिटल साखळीतील कंपनी रेनबो चिल्ड्रन मेडिकेअर लिमिटेडने आपला आयपीओ आणण्याचा निर्णय घेतला आहे. सदरच्या आयपीओतून कंपनी 2 हजार कोटी रुपये उभारणार असल्याचे सांगितले जाते. यासंबंधीची परवानगीकरीताची आवश्यक ती कागदपत्रे बाजारातील नियामक सेबीकडे सादर केली असल्याचे समजते. आयपीओअंतर्गत कंपनीकडून 280 कोटीचे इक्विटी समभाग विक्रीकरीता ठेवले जाणार आहेत.