सातारा : रुग्णालयांच्या मागणीनुसार जिल्हा प्रशासन दररोज त्यांना 35 टक्के रेमडेसिवीरचा पुरवठा करीत आहेत. तरीही फलटण येथील सुविधा हॉस्पीटलमध्ये वॉर्डबॉय रेमडेसिवीरचा काळाबाजार करीत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाचे औषध निरीक्षक अरुण गोडसे यांनी या वॉर्ड बॉयला रंगेहात अटक केेली.
हा वॉर्ड बॉय रेमडेसिवीरचे एक इंजेक्शन 35 हजार रुपयांना विकत असल्याचे समोर आले आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत. यापुढे रेमडेसिवीर औषधाचा काळाबाजार करत असल्याचे कोणी आढळल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.