नवी दिल्ली
सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येणाऱया काळात आपला आयपीओ (प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव) आणणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याकरीता आवश्यक कागदपत्रे सेबीकडे कंपनीने सूपुर्द केली असल्याचे समजते. कंपनी सदरच्या आयपीओतून 700 कोटी रुपये जमवणार असल्याचे सेबीला सांगितले असून सरकार कंपनीत आपले 8.66 कोटी समभाग विक्री करण्यासाठीचा प्रस्ताव ठेवणार आहे. रेल्वेलाइनसह ऑप्टीकल फायबरच्या नेटवर्कमध्ये कंपनीचे योगदान मोठे आहे.