नवी दिल्ली
शेअर बाजारात सध्या रेलटेलच्या समभागांनी दमदार कामगिरी नोंदवली आहे. अलीकडेच कंपनीला 11 कोटी रुपयांच्या कामाचे कंत्राट प्राप्त झाले आहे. रेलटेल कंपनीच्या समभागाचा भाव गेल्या महिन्यात 13 टक्के इतकी उसळी घेऊ शकला आहे. मागच्या सत्रात 130 वर बंद झालेला समभाग शुक्रवारी सकाळी 131 रुपयांवर खुला झाला होता. कंपनीने बाजार भांडवलाच्या माध्यमातून 4 हजार 300 कोटी रुपये उभारले आहेत. कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडकडून डाटा सेंटरच्या कामाचे कंत्राट कंपनीला प्राप्त झाले आहे.