नवी दिल्ली
रेलमी कंपनीचा नवीन स्मार्टफोन ‘रेलमी-5आय’ भारतात 9 जानेवारीला सादर करण्यात येणार आहे. या फोनमध्ये 5000 एमएएच क्षमतेची बॅटरी मिळणार आहे. यासोबतच फोटीग्राफीसाठी चार कॅमेऱयांचा सेटअपची सोय देण्यात येणार आहे. कंपनीच्या हालिया लाँच अँड्राईड 9पाय यावर आधारीत कलर ओएस-6.0.1 यावर तो चालवता येणार असल्याचे कंपनी म्हटले आहे. फोन दोन मॉडेलमध्ये सादर होणार असून यात 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज आणि 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजची सुविधा या फोनमध्ये उपलब्ध हेणार आहे. येत्या 9 जानेवारी रोजी फोनचे सादरीकरण लाईव्ह प्रसारण कंपनी यूटय़ूब पेजवर करणाल असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.