चिंचली रेल्वे स्थानकाजवळ घडली घटना
प्रतिनिधी/ बेळगाव
रेल्वेखाली सापडून एका अनोळखी वृध्देचा मृत्यू झाला आहे. तीन दिवसांपूर्वी चिंचली रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडली असून बेळगाव रेल्वे पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
पोलिसांनी सुमारे 60 वषीय अनोळखी वृध्देचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. रेल्वे रुळ ओलांडताना रेल्वेची धडप बसून तिचा मृत्यू झाला असावा, असा संशय आहे. मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
सध्या त्या वृध्देचा मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात ठेवण्यात आला आहे. 5.1 फूट उंची, अंगाने सुदृढ, काळसर वर्ण असे तीचे वर्णन आहे. या वृध्देने आपल्या अंगावर गुलाबी डिझाईन साडी, पांढरे ब्लाऊज परिधान केले होते. संबंधितांनी 0831-2405273 या क्रमांकावर बेळगाव रेल्वे पोलीस स्थानकाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.