रेल्वे पोलीस स्थानकात एफआयआर
प्रतिनिधी/ बेळगाव
चिकोडी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेच्या धडक्मया अनोळखी महिला गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी चिकोडी येथील सरकारी इस्पितळात दाखल करण्यात आले. मात्र उपचाराविना तिचा मृत्यू झाला.
सदर महिलेचे वय 45 असून तिची उंची 5.4 फूट आहे. रंगाने गहू वर्णीय असून चेहरा गोल आहे. नाक लांब आहे, तीने अंगावर हिरवी साडी आणि हिरवा ब्लाऊज परिधान केला आहे. तरी कोणालाही या महिले विषयी माहिती असल्यास बेळगाव रेल्वे पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.