ऑनलाईन टीम / पाटणा :
रेल्वेत एका 22 वर्षीय एचआयव्हीग्रस्त महिलेवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पटना-भबुआ इंटरसिटी एक्स्प्रेसमध्ये सोमवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
याप्रकरणी बीरेंद्र प्रकाश सिंग (26) आणि दीपक सिंग (28) या दोन आरोपींना पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पटना-भबुआ इंटरसिटी एक्स्प्रेसमध्ये सोमवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास एका डब्यात हा प्रकार चालू होता. त्याचवेळी पाहणीसाठी आलेल्या आरपीएफ आणि जीआरपीच्या जवानांना हा अत्याचार सुरू असल्याचे आढळले. तात्काळ पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. दोन्ही आरोपींनी गुह्याची कबुली दिली असून, स्थानिक कोर्टाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.