बेळगाव / प्रतिनिधी
नैर्त्रुत्य रेल्वेतर्फे रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाचे काम सुरू आहे. परंतु यासाठी अनेक वृक्षांची तोड करण्यात येत आहे. शनिवारी काँग्रेस रोड येथील रेल्वे रुळानजीक असणारा वृक्ष तोडण्यात आला. दुपदरीकरण होत असले तरी पर्यावरप्रेमींतून याबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
रेल्वे विभागाकडून मार्गाचे दुपदरीकरण व विद्युतीकरण करण्यात येत आहे. यासाठी रेल्वे रुळाच्या बाजूने असलेले वृक्ष तोडले जात आहेत. अनेक वर्षांपासून काँग्रेस रोड येथे हे वृक्ष सावली देत होते. हे वृक्ष तोडण्यास सुरुवात झाल्याने नाराजीचा सूर उमटत आहे.